Maval : इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे डोणे गावात श्रमसंस्कार शिबीर

एमपीसी न्युज – इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर मावळ तालुक्यातील डोणे या गावात 5 ते 15 डिसेंबर या कालावधीत होत आहे. शिबिराचे उद्घाटन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त विलासराव काळोखे यांच्या हस्ते झाले. काळोखे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी उपप्राचार्य प्रा ए आर जाधव,विभाग प्रमुख प्रा एस.पी. भोसले, प्रा.के.डी.जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.आर.जगताप, सदस्या प्रा.कन्हेरीकर मॅडम,प्रा. वानखेडे मॅडम व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.आर.डोके यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून संपूर्ण कामांची रूपरेषा सांगितली.

Talegaon Dabhade : जिल्हास्तरीय मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश परदेशी, श्रुती वेळेकर प्रथम

विलास काळोखे यांनी स्वयंसेवकांना तुमची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत.यासंबंधीच्या सूचना केल्या. उपप्राचार्य ए.आर.जाधव यांनी स्वयंसेवकांना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो.या भावनेतून आपण सेवा केली पाहिजे.या योजनेचा जो बिल्ला आहे.त्यावर लाल रंग जो आहे तो युवकांच्या उसळत्या रक्ताचा प्रतीक आहे व त्यातील निळा रंग जो आहे तो आकाशातील अथांग सागराप्रमाणे आहे आणि त्यातील एक अंश म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी अष्टप्रहर म्हणजे 24 तास नेहमी कार्य करत राहिले पाहिजे. असे त्यांनी सूचित केले. प्रा.भोसले सर व ग्रामस्थ यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.आर. जगताप यांनी सर्वांचे आभार मानले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त संदीप काकडे, प्राचार्य. डॉ.एस.के.मलघे आदी सर्वांनी या निमित्ताने शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.