Daund Crime News : पाटस परिसरात दोन युवकांचा दगडाने ठेचून निर्घृण खून

एमपीसी न्यूज – काठ्या, तलवारीने मारहाण करून दगडाने ठेचून दोन युवकांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील पाटस परिसरातील तामखंडा येथील भानोबा मंदीरा समोर रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहेत.

शिवम संतोष शितकल (वय 23 ) आणि गणेश रमेश माकर (वय 23) (दोघेही रा. पाटस, अंबिकानगर ता. दौंड) असे खून झालेल्या युवकांची नावे आहेत.

याप्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत मोहेश टुले दोघे रा. पाटस ( तामखंडा), युवराज शिंदे (रा. गिरिम ता. दौंड जि. पुणे ) व इतर चार ते पाच आरोपी पसार झाले आहेत. या आरोपींवर भारतीय दंड विधान 302, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम शितकल आणि गणेश माखर यांना मन्या उर्फ महेश संजय भागवत याने फोन करून विनाकारण शिव्या दिल्या. शिव्या का दिल्या असा जाब विचारायला गेले असता आरोपींनी त्यांना काठ्या व तलवार आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.