Pune : जमीन नावावर करतो असे सांगून इसमाची 60 लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – वेल्हा येथील जमीन नावावर करून देण्याच्या बहाण्याने इसमाची साठ लाख रुपयांना फसवणूक केली. याप्रकरणी एका 61 वर्षीय पुरुषाने सहकारनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

वृंदावन सहकारी फळबाग सोसायटीचे प्रशासकीय एकूण सहा सदस्यांनी फिर्यादी यांना सोसायटीची 86 गुंठा जमीन नावावर करून देतो असे सांगून त्यांच्याकडून डिसेंबर 2016 पासून आजपर्यंत वेळोवेळी एकूण 60 लाख रुपये घेतले. मात्र, जमीन नावावर करून दिली नाही. आणि फिर्यादी यांची फसवणूक केली.

सहकारनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.