Dehugaon News : पूनम काळोखे यांचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव

एमपीसीन्यूज : सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य ( Sarpanch Seva Sangh Maharashtra) यांच्या वतीने देहूगावच्या सरपंच पूनम विशाल काळोखे ( sarpanch Poonam Kalokhe) यांचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने (State level Adarsh ​​Sarpanch Award) नुकताच गौरव करण्यात आला. शिर्डीचे ( Shirdi) खासदार सदाशिवराव लोखंडे ( Mp Sadashiv Lokhande) यांच्या हस्ते काळोखे यांना हा पुरस्कार (award)  प्रदान करण्यात आला.

शिर्डी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी किर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख, स्त्री जन्म चळवळीच्या अध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया, ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे आदी उपस्थित होते.

पूनम काळोखे यांनी कोरोना ( Corona) महामारी आणि लॉकडाऊन (Lockdown) कालावधीत उल्लेखनीय कार्य केले. कोरोना संकटात गोरगरिबांना मदत, अन्नधान्य वाटप तसेच कोविड सेंटर (Covid Center)आणि निवारा केंद्राची उभारणी आदी कार्याची दाखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

मला मिळालेला हा पुरस्कार माझा नसून हा समस्त देहू ग्रामस्थांचा आहे. तसेच कोरोना संकट आणि लॉकडाऊन कालावधीत जनतेची सेवा करताना मावळचे आमदार सुनील शेळके (Maval Mla Sunil Shelke) यांचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ कायम होते. त्यामुळे संकटातही भरीव कार्य करणे शक्य झाले, अशा भावना सरपंच पूनम काळोखे यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.

तर, सरपंच पूनम काळोखे यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांनी केलेल्या नि:स्वार्थी व निरपेक्ष समाजकार्याची पोहोच पावती आहे. यामाध्यमातून त्यांचे कार्य राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. चांगली कामे केली तर नक्कीच दखल घेतली जाते. या राज्य पुरस्कारामुळे आणखी जोमाने काम करण्याकरिता नवी ऊर्जा मिळाली असल्याचे सरपंच काळोखे यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते विशाल काळोखे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.