Dehuroad : भरदिवसा कार अडवून चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – कारमधून जाणाऱ्या एकाला भरदिवसा अडवून मारहाण करण्यात आली. यामध्ये कारचालक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी चारच्या सुमारास किवळे येथे घडली.

शरद अर्जुन देव आसीजा (वय 37, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या कार मधून जात होते. ते सिम्बायोसिस कॉलेजजवळ सर्विस रोड येथे आले असता अज्ञात चारजण दोन दुचाकीवरून आले. त्यांनी शरद यांची कार अडवली. आरोपींनी शरद यांना कारमधून ओढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. एका आरोपीने धारदार शस्त्राने शरद यांच्या पोटरीवर जखम केली. यामध्ये शरद गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.