Dehuroad : विकासनगर येथे होमियोपॅथी गोळ्या आणि मास्कचे वाटप

Distribution of homeopathy Tablet and masks at Vikasnagar

एमपीसीन्यूज : श्री राजेंद्र बाळासाहेब तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने किवळे विकासनगर येथील नागरिकांना होमिओपॅथिक गोळ्या व मास्क वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा प्रारंभ विकासनगर रिक्षा स्टँड येथून करण्यात आला.

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब तरस, रिक्षा स्टँडचे अध्यक्ष राजू येवते, दिलीप काडलक, संतोष तरस, संतोष कदम, आशीष रोकडे, तानाजी ढवळे, हरिहर जोशी आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून किवळे आणि विकासनगर भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्यासंख्येने सापडले आहेत. तसेच या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे.

अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मास्कचेही वाटप करण्यात आले.

नागरिकांनी आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून सुरु होणाऱ्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनचे पालन करावे, कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

तसेच कोरोना प्रतिबांधासाठी महापालिका आणि शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन राजेंद्र तरस यांनी नागरिकांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.