Maval News : एकविरा गडावर प्रशांत वहिले प्रतिष्ठानच्या वतीने मास्कचे वाटप

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील मंदिरांचे दरवाजे घटस्थापनेपासून (दि. ७) उघडण्यात आले. राज्यातील अनेकांची आराध्यदेवता असलेल्या मावळ तालुक्यातील एकविरा देवीच्या मंदिराचे देखील दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. कोरोना साथ अद्याप संपली नसून योग्य खबरदारी घेणे अजूनही आवश्यक असल्याने वडगाव मावळ येथील प्रशांत वहिले प्रतिष्ठाण व रिच कलेक्शन यांच्या वतीने गडावर देवीचे पुजारी, गुरव, कर्मचारी यांनी मास्कचे वाटप करण्यात आले.

घटस्थापनेच्या पहिल्या माळेचा विधी संपन्न झाल्यानंतर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व उद्योजक राजेश ढोरे, राष्ट्रवादी काँ.मा.ता.युवा सचिव शैलेश वहिले, युवा नेते सोमनाथ बोत्रे, पांडुरंग बोत्रे, गणेश पवार, विराज वहिले आदींनी मुख्य पुजारी संजय गोविलकर, संतोष देशमुख, तेजस खिरे, राजु देशमुख, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड , बाळासाहेब गायकवाड यांना मास्कचे वाटप केले.

याप्रसंगी वेहेरगावचे सरपंच अर्चना देवकर, उद्योजक संदिप देवकर, उपसरपंच काजल पडवळ, पोलीस पाटील अनिल पडवळ, सुनिता देवकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.