Chikhali Crime News : धक्कादायक! बलात्कार करून लग्न करण्यास दिला नकार

एमपीसी न्यूज – पतीच्या मित्राने महिलेसोबत मैत्री त्यानंतर प्रेमप्रकरण करून तिला लग्नाचे अमिश दाखवले. त्यापोटी त्याने महिलेला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेवर बलात्कार करून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. ही घटना ऑगस्ट 2020 ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र आहे. आरोपीने फिर्यादी सोबत फोनवरून संपर्क ठेवला आणि मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर काही दिवसानंतर प्रेमात झाले. ऑगस्ट 2020 मध्ये आरोपी हा फिर्यादी महिलेला भेटायला तिच्या घरी आला.

त्याने महिलेला घराबाहेर बोलावून फिरायला जाण्याच्या बहाण्याने डुडुळगाव येथील एका लॉजवर नेऊन ‘तू तुझ्या नव-याला सोड. त्याच्याकडून घटस्फोट घे. तुझा नवरा काही कामाचा नाही. मी त्याला चांगले ओळखतो. तुझा घटस्फोट ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करतो’ असे अमिश दाखवले.

त्यानंतर फिर्यादी महिला नकार देत असतानाही आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिलेने आरोपीला ‘आपण पळून जाऊन लग्न करू’ असे विचारले असता आरोपीने ‘तू तुझ्या नव-याला आपल्या प्रेमसंबंधाबाबत सांगून ताक. घटस्फोट घे आपण लग्न करू’ असे सांगितले.

आरोपीवर विश्वास ठेऊन महिलेने ऑगस्ट 2021 मध्ये तिच्या पतीला त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाबाबत सांगितले. पतीने आरोपीला बोलावून घेतले. आरोपीने फिर्यादी महिलेच्या पतीसमोर प्रेम संबंधाबाबत सांगितले. त्यानंतर पती महिलेला घटस्फोट देण्यास तयार झाला. त्यानंतर महिलेने आरोपीला वारंवार फोनवर संपर्क केला असता आरोपीने महिलेशी लग्न करण्यास नकार देऊन महिलेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.