Dehuroad : चालकाला मारहाण करून चारचाकी पळवली; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चालकाला मारहाण करून चारचाकी वाहन आणि रोख रक्कम नेल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 डिसेंबर 2019 रोजी तळवडे कॅप जेमिनी रोडवर घडली.

अरविंद पवार, राठोड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) व अशोक चव्हाण (सर्व रा. राजगुरुनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एकनाथ रघुनाथ पवार (वय 45, रा. प्राधिकरण निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकनाथ यांनी कार (एम एच 14 / जी यु 8854) खरेदी केली. कार घेऊन जात असताना त्यांची गाडी आरोपिंनी अडविली. शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच गाडीची चावी घेतली. गाडीचा हप्ता भरण्यासाठी 24 हजार रुपये गाडीत ठेवले होते. ती रोकड तसेच इतर साहित्यासह आरोपी फिर्यादी यांची कार घेऊन गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.