Dehuroad Crime News : सोशल मीडियावरील बनावट अकाउंटद्वारे अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग
एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर महिलेच्या नावाने बनावट अकाउंट सुरु करुन त्यावरून अश्लील मेसेज व व्हिडीओ पाठवून महिलेचा विनयभंग केल्याबाबत अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार 12 डिसेंबर 2020 रोजी घडला असून याबाबत चार महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या नावाचा वापर करून अज्ञात इसमाने इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडले. त्याद्वारे आरोपीने पीडित महिलेला अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून तिचा विनयभंग केला असल्याची फिर्याद देहूरोड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.