Dehuroad : भरदिवसा घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून 11 हजार रुपयांची रोकड आणि 1 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 9) विकासनगर, देहूरोड येथे घडली.

पूजा मुरगेश (वय 30, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा रविवारी कामानिमित्त सकाळी साडेदहाच्या सुमारास बाहेर गेल्या. दरम्यान त्यांचे घर कुलुप लावून बंद होते. दुपारच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घरच्या टेरेसचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

घरातून 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, 30 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या आणि 11 हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

  • दुपारी साडेचारच्या सुमारास पूजा घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.