Wakad News : माथाडीच्या कामासाठी खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात माथाडीचे काम करता यावे म्हणून (Wakad News) सतत हप्ता मागणाऱ्यांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात प्रेस्टीज प्रोफाईल स्क्वेअर येथे घडला.

संतोष  रंगराव  चव्हाण (वय 40 रा.वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अक्षय काशिद प्रविण यादव यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Bhosari Crime : कोयता गँगची दहशत अद्याप कायम, कोयत्याचा धाक दाखवून एकाला लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी जिवे मारण्याची धमकी देत वाकड परिसरात माथाडी काम करता यावे यासाठी 10 हजार रुपयांचा हप्ता मागितला, (Wakad News) तसेच गुगल पेवरून 5 हजार रुपये काढून घेतले पुन्हा 16 जानेवारीला आणखी हप्त्याची मागणी केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.