Chikhali : रोडवर लावलेल्या गाडीतून डिझेलची चोरी

एमपीसी न्यूज – रोडवर लावलेल्या वाहनातून चोरट्याने डिझेल चोरी केली. ही चोरी करताना एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6) पहाटे चिखली येथे घडली.

जितेंद्र पोपट गवळी (वय 32, रा. आकांक्षा अपार्टमेंट, पूर्णानगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पूर्णानगर येथे आकांक्षा अपार्टमेंटसमोर जितेंद्र यांनी त्याची मोटार पार्क केली. पहाटे एक ते साडेचार वाजताच्या दरम्यान चोरट्याने फिर्यादी गवळी यांच्या मोटारीतील पाच हजार 440 रुपये किमतीचे डिझेल चोरून नेले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.