Dighi : श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल सव्वा कोटींचा घोटाळा उघडकीस; संचालक मंडळ व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लेखा परिक्षणातून (Dighi) श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये व्यवस्थापक व संचालक यांनी पदाचा गैरवापर करत तब्बल सव्वा कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात व्यवस्थापक, संचालक मंडळ यांच्यासह 12 जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा अपहार 31 मार्च 2017 ते मार्च 2022 या कालावधीत झाल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी लेखा परिक्षक संतोष शंकर पाटोळे यांनी शुक्रवारी (दि.20) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक शरद नरहरी ढमढेरे, महिला संचालक, अध्यक्ष देविदास सोपान भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र लक्ष्मण फुले, संचालक भगवान ज्ञानेश्वर रासकर, बाळासाहेब किसन पवार, प्रविण पोपटराव काळजे, ज्ञानेश्वर काळूराम पठारे, संतोष सोपान रासकर, भाऊसाहेब वसंत भोसले व दोन महिला संचालक यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक ढमढेरे व महिला संचालक यांनी कॅशबुकवरील 27 लाख 95 हजार 339 रुपये तसेच बचत खात्यातील रोख 97 लाख 7 हजार 743 रुपये एसा एकूण 1 कोटी 25 लाख 3 हजार 82 रुपयांचा अपहार करत ठेविदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला.

Bhosari : भोसरी येथे कंपनीला आग, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांनी आपल्या जबाबदारीचे पालन न करता कामकाजावर नियंत्रण ठेवले नाही. यामुळे (Dighi) पतसंस्थेकडे कर्ज वाटपासाठी निधी शिल्लक राहीला नाही, तुट वाढत गेली.

जमा असलेल्या निधीचा गैरवापर केला गेला. यामुळे सर्वांवर ठेविदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक झाली नसून दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.