Dighi : दरवाजा न उघडल्याने पत्नी आणि मुलीला मारहाण करणा-या पतीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – दारू पिऊन आलेल्या पतीने दरवाजा ठोठावला. पत्नीने लवकर दरवाजा उघडला नाही. यावरून पतीने पत्नी आणि मुलीला मारहाण केली. याबाबत पत्नीने पतीविरोधात गुन्हा नोंदवला. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री सव्वादहाच्या सुमारास दिघी येथे घडली.

राजेश गंगाराम प्रजापती (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी सोनामती राजेश प्रजापती (वय 35) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शुक्रवारी रात्री दारू पिऊन घरी आला. त्याने दरवाजा ठोठावला. सोनामती आणि त्यांच्या मुलीने दरवाजा लवकर उघडला नाही. काही वेळाने सोनामती यांनी दरवाजा उघडला असता राजेशने झोपलेल्या मोठ्या मुलीला आणि पत्नीला मारहाण केली.

तसेच स्वयंपाकाच्या सूरीने सोनामती यांच्या हातावर वार केले आणि लहान मुलीला मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.