Dighi crime news : दिघी रोडवर फ्लॅट फोडून 72 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज – लॉक लाऊन बंद असलेल्या फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील गॅस शेगडी, सिलेंडर टाकी, रोख रक्कम आणि दागिने असा एकूण 72 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी सात वाजता दिघी रोड, भोसरी येथील गंगोत्री पार्क येथे उघडकीस आली.

संदीप बबन शेळके (वय 36, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 7) रात्री अकरा ते मंगळवारी (दि. 8) सकाळी सात या कालावधीत फिर्यादी शेळके यांचा फ्लॅट लॉक लाऊन बंद होता.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कुलूप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने, एक गॅस शेगडी, गॅस सिलेंडर टाकी आणि रोख रक्कम असे एकूण 72 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.