Dighi : दारू प्यायला पैसे न दिल्याने मजुराचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज – दारू प्यायला पैसे न दिल्याने दोघांनी मिळून एका मजुराचा (Dighi) दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 30) सायंकाळी साडेचार वाजता चऱ्होली बुद्रुक येथील प्राईड वर्ल्ड सिटीच्या लेबर कॅम्पजवळ घडली.

गणेश भंगडा भिलाला (रा. झांजर, ता. बुऱ्हाणपूर, जि. नेपानगर, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी लालू जगन डावर (वय 33, रा. झांजर, ता. बुऱ्हाणपूर, जि. नेपानगर, मध्य प्रदेश), भुरा सीताराम किराड (वय 23, रा. चौपाली, हेलापडाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश. दोघे सध्या रा. प्राईड वर्ल्ड सिटीच्या लेबर कॅम्पमध्ये, चऱ्होली बुद्रुक) यांना अटक केली आहे.

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांना पकडला 31 किलो गांजा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश आणि आरोपी हे प्राईड वर्ल्ड सिटी येथे मजुरीचे काम करत होते. सोमवारी दुपारी आरोपी लालू आणि भुरा यांनी गणेश यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

मात्र गणेश यांनी आरोपींना पैसे दिले नाहीत. या कारणावरून आरोपींनी गणेश यांच्या डोक्यात, पाठीवर व इतर ठिकाणी मारहाण करून ठार मारले.

घटनेची माहिती मिळतच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत (Dighi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.