Dighi : घरासमोर पार्क केलेली दोन वाहने पेटवली

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली दोन वाहने अज्ञातांनी पेटवून दिली. यामध्ये एक कार आणि एक मोपेड दुचाकी जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री साडेअकराच्या सुमारास सिद्धिविनायक पार्क, कॉलनी क्रमांक एक, दत्तनगर, दिघी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत सुदाम तनपुरे यांची स्विफ्ट कार (एम एच 12 / जी आर 1155) मागील तीन दिवसांपासून त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. तर परशुराम खेळकर यांनी त्यांची मोपेड दुचाकी (एम एच 12 / क्यू सी 1545) सोमवारी रात्री घरासमोर पार्क केली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञातांनी ही दोन्ही वाहने पेटवून दिली.

शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि वाहन मालकांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून दोन्ही वाहनांची आग विझवली. मात्र, तोपर्यंत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.