Talegaon Dabhade News : शरद पवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त नगरपरिषदेच्या शाळेत वह्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा निरीक्षक, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका वैशाली प्रमोद दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. नगरपरिषद शाळा क्रमांक एक, नगरपरिषद शाळा क्रमांक दोन आणि नगरपरिषद शाळा क्रमांक पाच येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी नगरसेविका मंगल भेगडे, मावळ तालुका युवती अध्यक्षा निशा पवार, मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, मुख्याध्यापक प्रकाश जाधव,शोभा कांबळे, घाटे, रेखा विधाते, चेतना आसर, वैशाली साबळे, पाकिजा मुलानी,राजेंद्र शिंदे,धीरज भालेराव उपस्थित होते.

एका वर्षात 12 पौर्णिमा 81 वर्ष + दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यातील 27 पौर्णिमा= 999 पौर्णिमा + 19 ऑक्टोबर रोजीची कोजागिरी पौर्णिमा उर्फ शरद पौर्णिमा = 1000 पौर्णिमा ‘आदरणीय साहेबांच्या जीवनातील प्रवास हा राष्ट्रवादी परिवारातील सर्वच सदस्यांना आनंद देणारा आहे. सर्व समाजाला, महाराष्ट्राला, भारत देशाला प्रगतीपथावर नेणारा आहे.’

बुधवार (दि 19) पौर्णिमेनिमित्त तळेगाव नगरपालिकेच्या शाळा क्र 1,2,5 शाळेतल्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.