Pimpri News : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षितता किट वाटप

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते संजय मंगोडेकर यांच्या प्रयत्नातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षितता किट वाटप करण्यात आले. यात  बॅटरी , हेल्मेट, चटई, जेवणाचा डबा,मच्छरदाणी, बॅग , पाण्याची बाटली ,बूट ,दोरी, हातमोजे , मास्क , जॅकेट  इअरबड , इत्यादी वस्तूंचा समावेश होता.

गांधीनगर,खराळवाडी,विठ्ठलनगर,आनंदनगर,भिमनगर येथील  नागरिकांना  मंगोडेकर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ  मिळत आहे. प्रातिनिधिक स्वरूपात काही बांधकाम कामगारांना  स्वहस्ते किट चे वाटप करण्यात आले. यापुढे देखील हे काम असेच सुरू राहील.

त्यासाठी दिपक म्हेत्रे,सतिश भांडेकर, कांचन वाघमारे यांच्याशी संपर्क साधावा. जेणेकरून जास्तीत जास्त बांधकामं कामगारांच्या नोंदणी करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल तसेच येत्या काळात बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन मिळावे यासाठी देखील पठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.