PMPML News : विभागीय व्यवस्थापक संतोष माने सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) विभागीय व्यवस्थापक संतोष माने नुकतेच सेवानिवृत्त झाले.

पीसीएमटीचे पीएमपीएमएलमध्ये विलीनीकरण होण्यापूर्वी माने पीसीएमटीमध्ये भांडार विभागात कार्यरत होते. या ठिकाणी 20 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोडल ऑफीसर अतिरिक्त आगार व्यवस्थापक, प्रशासन व मानव संशोधन विभागात 32 वर्षे काम केले. परिवहन विभागातील विविध प्रशिक्षण घेऊन त्यांनी पीसीएमटी, पीएमपीएमएल सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शहरातील वाहतूक सुविधा सक्षण करण्यावर भर दिला.

प्रभावी नियोजन, डिझेल बचत केल्याबद्दल त्यांचा तत्कालीन महाव्यस्थापक नानासाहेब बोठे यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. उत्कृष्ठ कामगिरी केल्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप, तत्कालीन महाव्यवस्थापक नयना गुंडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.  त्याचबरोबर कोरोनाच्या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन माने यांचा गौरव केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.