Domestic Flights : 18 ऑक्टोबरपासून देशातील प्रवासी विमान वाहतूक पूर्ण क्षमतेने

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना, केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतूक संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 18 ऑक्टोबरपासून देशातील प्रवासी विमान वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी केलेल्या घोषणेनुसार, देशातील प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना पूर्ण 100 टक्के क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 18 ऑक्टोबरपासून विमानांमधून पूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहतूक करात येणार आहे.

9 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार देशातील सर्व विमान कंपन्यांनी मिळून एकूण 2 हजार 340 आंतरदेशीय विमानांचं उड्डाण केलं. त्यांच्या एकूण क्षमतेच्या हे प्रमाण 71.5 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.