Kasarwadi News : स्थानिकांच्या रोजीरोटीवर गदा आणू नका- अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंडिया क्लॉथ पासून शंकरवाडी पर्यंत असणाऱ्या सर्व दुकानदारांना नोटीस पाठवल्या असून जागा पालिकेकडे द्यावी. त्याबदल्यात त्यांना योग्य तो मोबदला देण्याची भूमिका पालिकेने घेतली आहे. परंतु, स्थानिक, व्यावसायिक यांचा त्याला विरोध आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने व्यवसाय करण्यास तिथले व्यापारी सहकार्य करतील. मात्र आपण स्थानिकांच्या रोजीरोटी वर गदा येईल असा निर्णय घेऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केले.

आमदार बनसोडे यांनी व्यवसायिकांसह आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,माजी नगरसेवक डब्बूशे आसवानी, सुरेखा लांडगे, प्रसाद शेट्टी,पवना बँकेचे संचालक जितेंद्र लांडगे, भाऊसाहेब लांडगे,रतन लांडगे,सामाजिक कार्यकर्ते सतीश लांडगे यांच्यासह इतर व्यापारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

आमदार बनसोडे म्हणाले, कासारवाडी मधील JRD टाटा उड्डाणपूल हा पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर टाकणारा आहे. त्यासाठी कासारवाडी येथील स्थानिक नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करत शहराच्या विकासकामाला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडे थोड्या थोडकीच जमिनी राहिल्या आहेत. त्यावर दुकाने थाटून भाड्याने देऊन तेथील स्थानिक आपला उदरनिर्वाह करत आहेत.मात्र गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंडिया क्लॉथ पासून शंकरवाडी पर्यत असणाऱ्या सर्व दुकानदारांना नोटीस पाठवल्या गेल्या आहेत. ती जागा महानगरपालिकेकडे द्यावी त्याबदल्यात त्यांना योग्य तो मोबदला व TDR दिला जाईल अशी भूमिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतली आहे. हे योग्य नाही.

वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने व्यवसाय करण्यास तिथले व्यापारी सहकार्य करतील. मात्र आपण स्थानिकांच्या रोजीरोटी वर गदा येईल असा निर्णय घेऊ नये. प्रशासन -स्थानिक- व्यापारी यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन कोणाच्याही हक्कावर गदा न येता सहकार्य करतील. त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतील असे आमदार बनसोडे यांनी सांगितले. त्याला आयुक्त राजेश पाटील यांनी देखील दुजोरा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.