Corona Warriors: एक डॉक्टर..एक फिजिओथेरपिस्ट..एक वॉरियर

dr saylee potnis written article on corona warriors जर एखाद्या रुग्णाची चाचणी सकारात्मक आल्यास त्याचा परिणाम त्याच्या श्वसन प्रणालीच्या संपूर्ण भागांवर होतो.

एमपीसी न्यूज (डॉ. सायली शैलेंद्र पोतनीस)- एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आयसीयू बॅकअप टीममध्ये काम करताना मला माझ्या प्रोफेशनबद्दल पूर्ण अभिमान वाटतो. खासकरून कोरोना वायरसचा प्रादुर्भाव जास्त असताना एक डॉक्टर म्हणून काम करताना आणि लोकांना अविरत सेवा पुरविताना मला अभिमान वाटतो.

जेव्हा माझ्यासह माझे अनेक सहकारी डॉक्टर १२ ते १४ तास पीपीई किट घालून काम करताना त्यांना होणारा त्रास हा कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परततात तेव्हा तो त्रास विसरून समाधान वाटते.

अशा कोविड संकटात एक डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी पार पाडताना माझ्या क्षेत्रात अधिक चांगले काम करणे मला सामर्थ्यशाली बनवते.

कार्डिओपल्मनरी फिजिओथेरपिस्ट म्हणून रुग्णांना उपचार आणि प्रशिक्षण देताना गंभीर रुग्ण अवस्थेपासून निष्क्रिय ते सक्रिय टप्प्यांत प्रगती होईपर्यंत त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नवीन उपचार पद्धती अंमलात आणणे हे एक आव्हान आम्हा डॉक्टरांसमोर आहे.

जर एखाद्या रुग्णाची चाचणी सकारात्मक आल्यास त्याचा परिणाम त्याच्या श्वसन प्रणालीच्या संपूर्ण भागांवर होतो. जितके जास्त फुप्फुस निरोगी तितकी जास्त  श्वसन प्रणाली निरोगी राहते. त्यामुळे फुप्फुस पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

चला या पुढील उपाययोजनांचा अवलंब करून संकट साखळी तोडण्याचा प्रयत्न करूया :-

१. दररोज श्वासोच्छवासाचा व्यायाम करा जेणेकरून आपले फुप्फुस निरोगी राहील. निरोगी खाऊ शकता. परंतु, तेलकट नाही.

२. योग्य मास्कचा वापर करा आणि दररोज मास्क धुवून वापरा.

३. आपले हात-पाय साबणाने धुवा.

४. डोळ्यांना आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.

५. जेव्हा जेव्हा तुम्हाला शिंका येतात किंवा खोकला येतो तेव्हा त्यास कोपर किंवा हाताने झाकून टाकावे किंवा टिश्यू वापरा आणि फेकून द्या.

६. एकमेकांशी संवाद साधताना अंतर राखणे.

७. आपला फोन, चष्मा आणि इतर सहाय्यक डिव्हाइस नियमितपणे स्वच्छ करा.

८. यावेळी अन्न आणि पेय सामायिक करणे टाळा.

९. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा.

१०.भरपूर कोमट पाण्याचे सेवन करा.

आणि होय, जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास काही दिवसांपेक्षा जास्त काळ त्रास वाटत आहे, अशी लक्षणे जाणवत असतील तर जवळच्या सरकारी रुग्णालयाला भेट द्या. किंवा कोविड हेल्पलाईन नंबर १०७५ ला त्वरित संपर्क साधा.  ठाम रहा, तंदुरुस्त राहा, निरोगी राहा.

– डॉ. सायली शैलेंद्र पोतनीस
कार्डिओपल्मनरी फिजिओथेरपिस्ट
चिंचवड, पुणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.