DY Patil Hospital : पेशंटचे जागेवर ऑपरेशन करा म्हणत डॉक्टरच्या कानाखाली मारली

एमपीसी न्यूज – पेशंटचे ऑपरेशन जागेवर करा, त्याला कुठेही हालवाये नाही म्हणत थेट डॉक्टरच्याच श्रीमुखात भडकावल्याचा प्रकार पिंपरी येथील डी.वाय.पाटील (DY Patil Hospital) मेडीकल हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि.23) सकाळी आठ वाजता घडला आहे.

याप्रकरणी डॉक्टर शिवाप्पा रविंद्र देवरमनी (वय 26, रा. डी.वाय.पाटील मेडीकल हॉस्पिटल बॉईज हॉस्टेल) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दुर्गेश राजन पुराणिक (वय 28, रा.मोशी) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Indrayani : इंद्रायणी घाटावर मांस शिजवण्याचा संतापजनक प्रकार; वारकरी संप्रदाय संतप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचे आजोबा कालीदास गजानन पुराणिक (वय 96) हे उपचारासाठी डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्या कमरेमध्ये फ्रॅक्चर असल्याने त्यांच्यावर ऑपरेशन करायचे होते. मात्र, आरोपीने फिर्यादी डॉक्टरला पेशंटला कोठेही हालवायचे नाही. गरज असेल तर तुमच्या कार्डीयाक डॉक्टरांनाच तुम्ही येथे बोलवा म्हणून जोरजोरात शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या कानाखाली मारली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस (DY Patil Hospital) पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.