Pune : ई-मान्यता प्रणाली राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल – दिपक केसरकर

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा परिषदेने  सुरू केलेली ई-मान्यता प्रणाली राज्यस्तरावरील एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली सुरु करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. (Pune) अशी प्रणाली विकसित करताना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या ई-मान्यता प्रणालीचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे दिपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, योजना संचालक महेश पालकर, मुख्याध्यापक संघाचे महेंद्र गणपुले, गणेश घोरपडे, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता महत्त्वाची आहे. शाळांना विविध मान्यता देताना गैरप्रकार होऊ नये यासाठी ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. (Pune) या प्रक्रियेतील त्रुटी दूर करून ती अधिक सुटसुटीत करावी लागेल आणि त्यासाठी यंत्रणेला चांगले प्रशिक्षण द्यावे लागेल. ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी संचमान्यता प्रणालीतील अडचणींचा आढावा घ्यावा.

राज्यस्तरावर सुरू करण्यात येणारी एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली राबविताना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा येणे गरजेचे आहे. (Pune) पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्याने अशी प्रणाली विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. नवे ॲप विकसित करताना अनेक ठिकाणी ऑफलाईनचा आग्रह का धरण्यात येतो त्याची कारणे शोधून त्रुटी दूर कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

Bhosari : तत्काळ पैसे कमावण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

शिक्षण क्षेत्रातील सुविधा निर्माण करताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचाही विचार करावा आणि नव्या क्षेत्राविषयीची कौशल्ये शिकविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही केसरकर यांनी केले. नवी प्रणाली विकसित करण्याबाबत त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे कौतुक केले.

जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या नव्या प्रणालीमुळे स्वमान्यता, प्रथम मान्यता, आरटीई अंतर्गत 25 टक्के शुल्काची प्रतिपूर्ती  आणि नवीन युडायस क्रमांक याबाबत प्रस्ताव सादर करणे, त्यावरील कार्यवाहीची माहिती घेण्यासाठी  जिल्हा परिषदेकडे  जावे लागणार नाही. तसेच वारंवार याबाबत माहिती देताना (Pune) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वेळही वाया जाणार नाही.  प्रस्तावातील त्रुटी ऑनलाईन कळणार असून त्याची पूर्ततादेखील ऑनलाईन करता येणार असल्याने शाळांसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल असे यावेळी मुख्याध्यापकांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.