Bhosari : तत्काळ पैसे कमावण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यानंतर (Bhosari) तत्काळ आकर्षक पैसे मिळतील, अशा बहाण्याने तीन लाख 32 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार कासारवाडी येथे उघडकीस आला. ही घटना 29 मार्च रोजी घडला.

खय्युम जिलानी बागवान (वय 31, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : राष्ट्रगौरव छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक अभियान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना टेलिग्रामवरून अनोळखी व्यक्तींनी संपर्क केला. त्यांना एक लिंक पाठवून ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास तत्काळ व आकर्षक पैसे (Bhosari) मिळतील असे आमिष दाखवले. त्यापोटी फिर्यादीकडून तीन लाख 32 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.