BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : लोखंडाचा अपहार केल्याप्रकरणी आठ जणांना अटक

0

एमपीसी न्यूज – बारा हजार रुपयांचे लोखंड ट्रकमधून नेऊन त्याची संगनमताने विक्री केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी तळेगाव दाभाडे येथील भोलेनाथ हॉटेलमागील भंगार दुकानासमोर घडली.

संजय मारुती पुरी, अंताराम गणपत काकडे (दोघे रा. तळेगाव दाभाडे), अब्दुल रहमान शाह, शमशुद्दीन हिदायतुल्ला अन्सारी, अक्रम बाकर खान, शेरा माईन खान, आनंदा दादासाहेब बाबर, मानाजी पांडुरंग कदम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उमेश शामसुंदर हांडे (वय 36, रा. गणेगाव धुमाळा, ता. शिरूर) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीला 18 नग बॉक्स अँगल, 15 नग स्टील बार असे एकूण 12 हजार रुपयांचे लोखंड तळेगाव दाभाडे येथील भोलेनाथ हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या भंगारच्या दुकानात विकण्यासाठी दिले होते. ट्रक चालक आणि भंगार दुकानदार यांनी संगनमत करून सर्व लोखंडाची चोरी करून अपहार केला. याबाबत पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like