Encounter with Terrorists: पुलवामा येथे चकमकीत दोन दहशतवादी ठार, सोलापूरच्या जवानाला वीरमरण

Encounter with Terrorists: Two terrorists killed in encounter at Pulwama, CRPF jawan martyred जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 20 दिवसांत 36 अतिरेक्यांचा खात्मा

एमपीसी न्यूज – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार आणि एक सीआरपीएफ जवान शहीद झाला. दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने मंगळवारी सकाळी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बुंडजू येथे घेराव कारवाईला सुरूवात केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला आणि त्यातून ही चकमक झाली.  दरम्यान, सुनील काळे असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावचे रहिवासी आहेत.

यापूर्वी रविवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले होते की, शहरातील जुनिमार भागात अतिरेक्यांच्या अस्तित्वाच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसर घेरला आणि शोध मोहीम सुरू केली.

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाने तेथील दहशतवाद्यांचा शोध घेत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली, त्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. पोलिसांनी वारंवार प्रयत्न करूनही दहशतवाद्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास नकार दिला.

गेल्या वीस दिवसांत 36 दहशतवाद्यांचा खात्मा 

यावर्षी आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दलाने 110 हून अधिक दहशतवादी ठार केले आहेत. गेल्या वीस दिवसांत सुरक्षा दलाने सुमारे 36 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचे महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले की, हे अतिरेकी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित आहेत. ते आता अत्यंत निरागस लोकांना लक्ष्य करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.