Shivtejnagar News : मोफत आरोग्य शिबिरात 175 नागरिकांची तपासणी; नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ति प्राणप्रतिष्ठा स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व गुंजकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 175 नागरिकांची तपासणी करण्यात आली.

शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात रविवारी झालेल्या आरोग्य शिबिराचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक प्रा. हरिनारायण शेळके, अर्चना तौंदकर, डॉ. लक्ष्मीकांत शामसुंदर, डॉ. राम मुंडे उपस्थित होते.

या शिबिरात हिमोग्लोबीन, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रोल, हाडांची घनता, बीएमआय, टुडी-इको, सीबीसी, ईसीजी, लिपिड, लिव्हर, किडनी प्रॉफाईल, काही तपासण्या करण्यात आल्या. परिसरातील 175 नागरिकांची या शिबिराचा लाभ घेतला.

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान हे शिवतेजनगर भागात गेली दोन वर्षांपासून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यातील एक उपक्रमाचा भाग म्हणून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व स्वामी भक्तांनी या आजच्या शिबिराला भरघोस प्रतिसाद दिला. 175 नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला, असे आयोजक नारायण बहिरवाडे यांनी सांगितले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी सेव प्रतिष्ठानच्या जेष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, युवा मंच, सेवेकरी सर्वांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.