Lonavla News : खोपोलीजवळ एक्सप्रेस वेवर बस व ट्रेलरचा अपघात; 8 जण जखमी

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत किमी 39 याठिकाणी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी प्रवासी बस समोर जाणार्‍या ट्रेलरला मागून जोरात धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये एक जण गंभिर तर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. आज सोमवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला.

अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी दाखल झालेले बोरघाट पोलीस, आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, सेव्ह लाईफ, लोकमान्य हॉस्पिटल आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम यांनी तातडीने किरकोळ जखमींवर उपचार सूरू केले तर गंभीर जखमीला उपचारासाठी पुढे रवाना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.