Facebook Fraud : फेसबुक मार्केटवरून सामान खरेदी करणे पडले महागात

एमपीसी न्यूज – फेसबुक मार्केटवरून (Facebook Fraud) ऑनलाईन सामान घेणे एकाला चांगलेच महागात पडले असून ग्राहकाची 18 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार देहुगाव येथील एका नागरिकासोबत 31 जुलै रोजी घडला आहे.

याप्रकरणी विकास मुकुंद निकम (वय 31 रा.देहुगाव) यांनी गुरुवारी (दि.29) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सिमीत कुमार व श्रीकांत सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा व आरोपींचा संपर्क फेसबुक मार्केट या ऑनलाईन मार्केटवरून झाला. आरोपींनी तेथे सीआयएफमधील अधिकारी असून त्यांची बदली झाली असल्याने घरातील सामान विकायचे आहे अशी जाहिरात टाकली होती. फिर्यादी यांना सामान हवे असल्याने त्यांनी आरोपींशी संपर्क साधला.

Pune : ओरिगामी संबंधित ‘ओरू’ मासिकांचा संच आता पुण्यातही!

यावेळी आरोपीने मोबाईलवरून सामानाचे (Facebook Fraud) फोटो व किंमत फिर्यादी यांना पाठवली. यावेळी सिमीतने सामान ट्रान्सपोर्टमध्ये अडकले असून पुढे पाठविण्यास सांगितले आहे, असे सांगितले व आरोपी श्रीकांत याने फिर्यादी कडून सामानाचे 18 हजार रुपये घेतले व सामान पाठवले नाही. यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.