Meena Deshpande Passed Away: प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन

मीना देशपांडे या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. मीना देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती असे सांगितले जाते.

एमपीसी न्यूज- प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन झालं आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीना देशपांडे या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. मीना देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती असे सांगितले जाते. प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

मीना सुधाकर देशपांडे यांची साहित्य संपदा:

आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)

अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड 6-7-8)

पपा – एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)

मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित कादंबरी)

मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)

ये तारुण्या ये (कथासंग्रह)

हुतात्मा (कादंबरी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.