Fire News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारला आग

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारला आग लागली. ही घटना आज (गुरुवारी, दि. 20) दुपारी तीन वाजताच्या सुमारास सोमाटणे टोल नाक्याजवळ घडली.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कार गुरुवारी दुपारी पुण्याकडून मुंबईकडे द्रुतगती मार्गावरून जात होती. सोमाटणे टोल नाक्याजवळ (69 किलोमीटर) कार ओव्हर हिट झाली आणि इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे चालकाने कार बाजूला घेतली.

कार थांबवून चालक कारमधून खाली उतरला असता कारने दुपारी तीन वाजताच्या सुमारास पेट घेतला. काही वेळेत आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत आगीत कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.