Pune : माजी आमदार अरविंद लेले कुटुंबीयांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट!

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या सर्व कुटुंबाची एकत्रित भेट घेतली. माझे वडील कै. डॉक्टर अरविंद लेले (Pune) यांचा चरित्र ग्रंथ “कृतार्थ”  त्यांनी सस्नेह सादर केला. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात लेले यांनी म्हटले आहे.

Talegaon Dabhade : महापुरूषांची चरित्रे म्हणजे जगण्याचे प्रेरणास्रोत – डाॅ. संभाजी मलघे 

तसेच, तळजाई शिबिरामध्ये कै. बाबूजींनी गायलेल्या आणि माझ्या वडिलांनी लिहिलेल्या हिंदू सारा एक या गीताची एक सुंदर फ्रेम करून त्यांना भेट दिली. पीएम केअर्स फंड या प्रधानमंत्री कोशामध्ये आम्हा सर्व कुटुंबीयांतर्फे ₹ दोन लक्ष समर्पण केल्याचे लेले कुटुंबियानी सांगितले.

भारताच्या भविष्याची दिशा बदलणारे आणि हिंदू संस्कृतीला जगात मानाचे स्थान पुन्हा मिळवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे  पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या वडिलांच्या आणि त्यांच्या जुन्या स्नेहाची आठवण ठेवून आम्हा सर्व कुटुंबीयांना त्यांनी  वेळ दिली . त्यांच्यासारख्या अत्यंत तेजस्वी व्यक्तीला भेटून कृतकृत्य झाल्याचा अनुभव येत आहे.

आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची त्यांनी वैयक्तिक चौकशी देखील केली. “पक्षाचे काम करताना पूर्ण समर्पण भावनेने कर. आपल्या विचारांपासून आणि तत्वांपासून फारकत घेऊ नकोस. सामाजिक कार्य करताना अंत्योदय हेच आपले ध्येय असले पाहिजे” असे त्यांनी आवर्जून सांगितले. आजचा दिवस आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी सोन्याचा वर्षाव करणारा ठरल्याचे अनुराधा लेले, मिलिंद लेले, प्रमोद लेले, हेमंत लेले, सुवर्ण लेले, अंजली लेले यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.