Pimpri News : शिवसेना जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पिंपरी- चिंचवड मावळ जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने  चाबुकस्वार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

शिवसेना दोन गटात विभागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना असे दोन गट झाले आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे बाळासाहेबांची शिवसेनेत गेले. तर, पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

Pune News : भोर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील पर्यवेक्षिकेवर लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई

ठाकरे यांनी गौतम चाबुकस्वार यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी- चिंचवड मावळ जिल्हाप्रमुखपदी चाबुकस्वार यांची नियुक्ती नियुक्ती केली आहे. चाबुकस्वार यांनी 2014 ते 2019 दरम्यान शिवसेनेकडून पिंपरीचे विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. (Pimpri News) पिंपरी-चिंचवड शहराचे उपमहापौर म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणाची  नस त्यांना माहिती आहे. कट्टर शिवसैनिकांना एकत्र करून संघटना अधिक बळकट करण्याचे चाबुकस्वार यांच्या समोर आव्हान असेल. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी चाबुकस्वार यांना झोकून देऊन काम करावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.