Pune News : भोर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील पर्यवेक्षिकेवर लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई

एमपीसी न्यूज : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, (Pune News) भोर येथील पर्यवेक्षिकेवर लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी कारवाई केली आहे.

याबाबत एका 54 वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. याप्रकरणी विद्या सोनवणे, वय 49 वर्षे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोनावणे या पर्यवेक्षिका (वर्ग -3) एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प भोर ( जिल्हा परिषद पुणे अंतर्गत) या पदावर काम करत आहेत.

Pune News : “प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर दुकान तोडून टाकू”, खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वेय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भोर पोलीस ठाण्यात सुरू आहे. 17 जानेवारी 2023 रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भोर पुणे यातील तक्रारदार व लोकसेवक पर्यवेक्षिका विद्या सोनवणे या भोर येथे एकाच (Pune News) कार्यालयात काम करत असून, त्यांच्या कार्यालयाच्या झालेल्या ऑडिटच्या अनुषंगाने ऑडिटर यांना देण्यासाठी पर्यवेक्षिका सोनवणे यांनी चार हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे दिली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक पर्यवेक्षक विद्या सोनवणे यांनी 4000 ची मागणी करून  17 जानेवारी 2023 रोजी ती लाच रक्कम स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला. प्र. वि पुणे  परिक्षेत्र, अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश गुरव, ला. प्र. वि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.