Pune News : “प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर दुकान तोडून टाकू”, खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पान शॉप च्या दुकानातून घेतलेल्या वस्तूंचे पैसे न देता दुकान मालकाकडेच 5000 रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Pune News) सहकार नगर मधील हत्ती चौकातील निशिगंधा पान शॉप या ठिकाणी हा प्रकार घडला. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. 

मयूर दारवटकर आणि गणेश मोरे या दोघांना अटक केली आहे. यांच्यासह धीरज आरडे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार चंद्रकांत रसाळ यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. सहा जानेवारी रोजी हा प्रकार घडला.

Pune News : रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वादावादी; गुन्हा दाखल

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे हत्ती चौकात पान शॉप चे दुकान आहे. 6 जानेवारी रोजी आरोपींनी फिर्यादी यांच्या पान शॉप मधून काही वस्तू घेतल्या होत्या. त्यावर फिर्यादी यांनी पैशाची मागणी केली असता शिवीगाळ करून धंदा न करू देण्याची धमकी दिली. (Pune News) आरोपी धीरज आरडे यांनी कमरेचा चाकू काढून फिर्यादी यांच्या पाठीमागे लावला आणि ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून दोन हजार रुपये घेतले. तसेच धंदा करायचा असेल तर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर दुकान तोडून टाकू अशी धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.