Talegaon Crime News : जमीन विक्रीच्या बहाण्याने महिलेची 60 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जमिनीची पॉवर ऑफ ॲटर्नी आपल्याकडे असल्याचे खोटे सांगून जमीन विक्रीच्या बहाण्याने महिलेकडून जमीन खरेदीसाठी 60 लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली. हा प्रकार 22 फेब्रुवारी 2021 ते 23 एप्रिल 2022 या कालावधीत तळेगाव स्टेशन येथे घडला.

विश्वजित उर्फ भाऊ कामठे, छाया दत्तात्रय बोत्रे, अमोल दत्तात्रय बोत्रे, मयुरी दत्तात्रय बोत्रे (लग्नानंतरचे नाव मयुरी मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत महिलेने शनिवारी (दि. 23) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी नावाच्या व्यक्तीच्या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी आरोपींकडे असल्याचे भासवून 00.85 आर जमीन फिर्यादी यांना विकण्याचा आरोपींनी बनाव केला. त्यासाठी फिर्यादीकडून 60 लाख रुपये घेतले. आरोपी विश्वजित आणि छाया यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ही बाब त्यांनी फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवली. फिर्यादीला आरोपी छाया हिला पैसे देण्यास आरोपींनी भाग पाडले.

याप्रकरणी फिर्यादी यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी छाया दत्तात्रय बोत्रे या महिलेला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.