Lata Mangeshkar Award : पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान

एमपीसी न्यूज – लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज (रविवारी, दि. 24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे हा सोहळा पार पडला. पुरस्काराचे यावर्षी हे पहिले वर्ष होते.

लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यावर्षीपासून सुरु करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “लता दीदींसोबत माझं खूप जुनं नातं आहे. सरस्वतीचं प्रतिरूप म्हणजे लतादीदी. मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान आहे. संगीत हे साधनही आहे भावनाही आहे. सुधीर फडके यांच्यामुळे लतादीदींबरोबर माझी ओळख झाली. लता दीदींचे सूर युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. संगीताची शक्ती लता दीदींमधून दिसली. लता दीदींच्या गाण्यात राष्ट्रभक्ती आहे.

“आयेगा आनेवाला” हे पाहिलं गाणं हिट झालं. मला दिलेला हा पुरस्कार मी भारताच्या जनतेला समर्पित करतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, मंगेशकर कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.