Thergaon News : थेरगावात शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – कै. नागुभाऊ गतिराम बारणे मेडिकल फाऊंडेशन यांच्या वतीने नगरसेविका माया बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी (दि.25) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. थेरगाव, संतोषनगर येथील संतोष मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन बारणे यांनी दिली.

हृदयरोग, किडणी विकार, प्रत्यारोपण, हाडांचे व मणक्यांचे आजार, हिप प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग, कान-नाक-घसा, अनियंत्रित रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात येणार आहे. मोफत चष्मे आणि औषधांचे वाटप केले जाणार आहे.

सर्व आजारांवर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत. तपासणीसाठी येताना ओळख व पत्त्याचा पुरावा आणावा, असे सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी विराज बारणे – 9921330007, डॉ. गणेश जाधव – 9890905560 यांच्याशी संपर्क साधावा. परिसरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.