Pune news: उत्तर प्रदेशातून ‘ते’ यायचे विमानाने; अन् घरफोड्या करून जायचे परत!

एमपीसीस न्यूज – उत्तर प्रदेशातून पुण्यात विमानाने येऊन घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. चोरी झाल्यानंतर त्यातील एक जण चोरीचा मुद्देमाल घेऊन ट्रॅव्हल्सने जायचा. तर इतर सर्व विमानाने उत्तर प्रदेशात परत जायचे.

परवेज शेर मोहम्मद खान (वय 43) आणि तस्लिम अरीफ समशूल खान (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात होणाऱ्या घरफोड्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. यासंबंधी गुन्हेगारांची माहिती घेत असताना आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगार रेकी करून घरफोडीचे गुन्हे करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यातील दोन चोरटे लोहगाव येथे थांबले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी केल्याचे कबूल केले. या चोरीतील 130 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार आहे. चोरी करण्यासाठी ते उत्तर प्रदेशातून पुण्यात विमानाने यायचे. चोरी केल्यानंतर एक जण बसने मुद्देमाल घेऊन जायचा तर दुसरा परत विमानाने जायचा. यातील दोघांवरही यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.