Pune News : पाळणाघर चालवणाऱ्या महिलेच्या मुलाकडून सात वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार 

एमपीसी  न्यूज : पुण्यातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामावर जाताना एक 36 वर्षीय महिला आपल्या दोन मुलींना शेजाऱ्याच्या घरी ठेवून जात असे. याचाच गैरफायदा या महिलेच्या 18 वर्षीय मुलाने घेतला असून सात वर्षीय मुलीवर आरोपीने वारंवार बलात्कार केला आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही केली आहे. 36 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यासाठी असून त्या नोकरी करतात. त्या आपल्या दोन मुलींना शेजारीच राहत असलेल्या एका महिलेच्या घरी ठेवून कामावर जात असत. यासाठी फिर्यादी महिला या संबंधित महिलेला महिन्याकाठी तीन हजार रुपये देखील देत होते. परंतु या महिलेच्या 18 वर्षीय मुलाने फिर्यादी महिलेच्या सात वर्षे वयाच्या मोठ्या मुलीसोबत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संभोग करत होता. 2017 ते एप्रिल 2021 या काळात वारंवार हा प्रकार घडला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. वानवडी पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेत आरोपीविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.