Ganeshotsav 2023 : बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी, खरेदीसाठी बाजारात लोकांची गर्दी उसळली!

एमपीसी न्यूज – चैतन्य आणि मांगल्याचे (Ganeshotsav 2023 )प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोकांची एकच गर्दी उसळली असून विविध प्रकारच्या गणेश मूर्ती, आकर्षक सजावटीचे साहित्य, फुले, कापडांसह दागिन्यांच्या दुकानांमध्येही खरेदीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे.

शहरातील पिंपरी कॅम्प, चिंचवड गाव, भोसरी, चिखली, निगडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड, अशा महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये गणेश मूर्तींसह सजावटीचे साहित्य, देखाव्यांचे साहित्य यासोबतच पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी लहान मुलं, तरुणांसह ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Pune Ganeshotsav : गणरायाच्या आगमन सोहळ्यानिमित्त पुण्यात मंगळवारी वाहतुकीत बदल

तसेच गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर सोने चांदीच्या दुकानांमध्ये दागिन्यांच्या खरेदीसाठी लोकांनी पसंती दर्शविली. लोकांनी गजबजलेल्या बाजारपेठांना विक्रीसाठी ठेवलेल्या विविध रंगांच्या सजावटीच्या साहित्यामुळे बहर आल्याचे चित्र निर्माण झाले. शहरात ठिकठिकाणी गणेश मंडळानी आकर्षक व पारंपारिक मंडप उभारण्याचे काम पूर्ण केले असून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.

Metro News : गणेशोत्सव काळात मेट्रो धावणार मध्यरात्री पर्यंत!

बाजारात विक्रीसाठी शाडू माती, पीओपीच्या बहुआकाराच्या आकर्षक मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. प्लास्टिक व कागदी (Ganeshotsav 2023) देखावे, सजावटीच्या वस्तू, विद्युत रोषणाईसाठी रंगबेरंगी लायटिंग, विविध प्रकारचे मोदक मिठाई यांच्यासह फुलांच्या आणि फळांच्या खरेदीला देखील उधान आल्याचे पाहायला मिळते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर नागरिकांनी भर द्यावा असे आवाहन स्थानिक प्रशासन, पर्यावरण प्रेमी संघटनांनी केले असून त्याकडे नागरिकांची ओढ असल्याचेही दिसते आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.