Bhosari crime : तलवार हातात घेऊन दहशत पसरवणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

एमपीसी न्यूज मी फुले नगरचा भाई आहे  म्हणत हातात तलवार घेऊन सायंकाळी वर्दळीच्यावेळी रसत्यावर दहशत पसरवणाऱ्या तडीपार गुंडाला (Bhosari crime) भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.15) सायंकाळी भोसरी येथील महात्मा फुलेनगर येथील कमानीजवळ घडला.

चन्नाप्पा परशुराम सुतार (वय 23 रा.भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याला एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे यांनी 5 ऑगस्ट 2021 पासून दोन वर्षा करीता पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परीक्षेत्रातून तडीपार केले होते.

Subway Crime : ‘सब वे’मध्ये काम करणाऱ्या तरूणीशी गैरवर्तन करणाऱ्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

असे असतानाही तो परीसरात आला व त्याने बेकायदेशीररित्या हातात तलवार घेऊन ती फिरवत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. (Bhosari crime) यावेळी मी फुलेनगरचा भाई आहे असे म्हणून तलवार फिरवली. यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.