Vadgaon Maval : खरीप हंगामापूर्वी शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज – नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र अजूनही नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना ही अनुदान रक्कम मिळालेली नाही. खरीप हंगामापूर्वी हे प्रोत्साहनपर अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा करावे. अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी सांगितले.

नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान रक्कम मिळावी याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चा मावळ तालुका आयोजित एक दिवसीय लाक्षणिक उपोषण वडगांव मावळ येथे करण्यात आले. यावेळी अध्यक्ष रवींद्र भेगडे बोलत होते.

आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना दिले. यावेळी महाराष्ट्र किसान मोर्चाचे सचिव संतोष दाभाडे, किसान मोर्चा अध्यक्ष सुभाष धामणकर, भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे, अमोल भोईरकर, राजाराम असवले, किसन सावळे, किसन येवले, हरिभाऊ दळवी, संतोष काळे, किसन अंबोले, संतोष येवले, बाळासाहेब पारखी,अमोल केदारी,बाबूलाल गराडे, गणेश भांगरे,नथुराम करवंदे,विनायक भेगडे यांच्यासह भाजपा मावळ तालुका किसान मोर्चाचे कार्यकर्ते व शेतकरी कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित होते.

भेगडे पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्तीची घोषणा करतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊ ही घोषणा सभागृहात करून दोन वर्षे उलटले तरी अद्याप पर्यंत याची अंमलबजावणी शासनाने केलेली नाही यामध्ये पुणे जिल्ह्यातील व मावळ तालुक्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. शेतकरी आपले दाग,दागिने गहाण ठेवून नियमित कर्जफेड करत आहेत तरी शासनाने येणाऱ्या खरीप हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान रक्कम अदा करावी अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने येणाऱ्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असे रविंद्र भेगडे अध्यक्ष भाजपा मावळ तालुका यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण प्रसंगी बोलतांना सांगितले.

नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत सरकारने देण्याचे जाहीर केले होते परंतु सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व नाराजी असून त्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड नियमित व वेळेत करून चूक तर केली नाही ना कर्जाची परत फेड करावी की नाही अशी संभ्रमावस्था व मनस्थिती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे, असे मत तालुका अध्यक्ष सुभाष धामणकर यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.