Ajit Pawar : महापालिकेच्या प्रकल्पांना कुटुंबातील व्यक्तींऐवजी महापुरुषांची नावे द्या!

एमपीसी न्यूज – आयटीनगरीमुळे (Ajit Pawar) पिंपरी-चिंचवड शहराचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. महापालिकेच्या प्रकल्पांना प्रत्येकाच्या घरातील व्यक्तींची नावे भावनिक दिली जातात. त्याऐवजी प्रकल्पांना थोर महापुरुषांची नावे दिली पाहिजेत. त्याबाबत नगरविकास खात्यातूनच काही आदेश काढावेत का, याचा विचार करत आहे. किंवा नावांबाबत मंत्रालयातून परवानगी घ्यायची असे काय करता येते का, याचा विचार आपल्याला करावा लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना जे.आर.टी. टाटा उड्डाणपुल, मदर तेरेसा यांचे नाव द्या असे मी सांगत होतो. सगळ्यांना बरे वाटत होते. आयटीमुळे पिंपरी-चिंचवडचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. माझी हात जोडून विनंती आहे.

प्रत्येकाच्या घरातील व्यक्तींची नावे विकासकामांना (Ajit Pawar) भावनिक होऊन देतात. त्याऐवजी तुम्ही राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह विविध महानपुरुषांची प्रकल्पांना नावे दिली पाहिजेत. नाव पाहिल्यानंतर सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. मी दुसऱ्या कोणाचा अनादर करत नाही. आपल्या शहराच्या भल्याचे सांगत आहे.

SRA Project : ‘रेडझोन हद्दीत सर्वसामान्यांना घर बांधण्यास परवनागी नाही, मग एसआरए प्रकल्प कसा, चौकशी करा’

मोठ-मोठ्या लोकांचे नाव घेतले. तरी, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर येतो. अशा पद्धतीने याचा बारकाईने विचार केला पाहिजे. त्याबाबत नगरविकास खात्यातूनच काही आदेश काढावेत का, याचा विचार करत आहे. किंवा नावांबाबत मंत्रालयातून परवानगी घ्यायची असे काय करता येते का, याचा विचार आपल्याला करावा लागणार असल्याचेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.