Hadapsar Crime News : हडपसरला कॅनॉलमध्ये 3 मृतदेह सापडल्याने खळबळ

एमपीसी न्यूज – पुण्यातील हडपसर परिसरात कालव्यातून वाहत आलेले तीन मृतदेह सापडल्याने (Hadapsar Crime News) एकच खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरातील शिंदे वस्ती आणि वाहतूक शाखेचे जवळ असलेल्या काव्यात मृतदेह सापडले.

जीवरक्षक डॉक्टर बच्चू सिंग टाक यांनी हे मृतदेह पाण्याबाहेर काढले आहे. पोलिसांनी या मृतदेहाचा पंचनामा करून शोध घेण्यासाठी ते ससून रुग्णालयात पाठवले.

Chinchwad Crime News : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलावर वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील कालव्यातून मृतदेह वाहत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हे मृतदेह (Hadapsar Crime News) पाण्याबाहेर काढले.

यातील दोन मृतदेह हडपसर वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ तर आणखी एक मृतदेह शिंदेवस्ती येथून बाहेर काढला.

या तीनही मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवले आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.