Hadapsar : पुणे – बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे हडपसर येथे दिमाखात उदघाटन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या (Hadapsar) सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे उद्घाटन दिमाखात संपन्न झाले.  हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्ट्रा मॅन दशरथ जाधव यांच्या हस्ते फ्लॅग फडकवून उद्घाटन करण्यात आले.

Chinchwad : पैशांचा तगादा लावला म्हणून वृद्धाचे केले अपहरण, एकाला अटक

हा समारंभ आमदार अ‍ॅड. अशोक पवार, आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगेश सातव, आयर्नमॅन रश्मी सातव, आयर्नमॅन विनोद बोरोले, रा. कॉ. पक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश घुले,  माजी महापौर  राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक सुनिल बनकर, माजी नगरसेवक शिवाजीराव पवार, नगरसेवक  योगेश ससाणे, हडपसर रा. कॉ. अध्यक्ष शंतनू जगदाळे, रा. काँ., हडपसर कार्याध्यक्ष अमर तुपे,

Pune : अनिल खैरे यांच्या कामाची व्याप्ती फार मोठी – नाना पाटेकर

संदीप बधे, आदिनाथ भोईटे,  स्मिता दातीर, सागरराजे भोसले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव श्री. एल.एम. पवार, सहसचिव (प्रशासन) श्री. ए. एम.जाधव तसेच सायकल असोसिएशनचे प्रतापराव जाधव, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे , प्राचार्य अशोक भोसले, प्राचार्य आर. व्ही. पाटील, नितीन सावळे, प्राचार्य सचिन भारद्वाज, प्राचार्य आश्विनी शेवाळे, प्राचार्य रंजना पाटील, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.

दरम्यान ढोल पथक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जागोजागी सायकलपटूंना जल्लोषात स्वागत करत प्रोत्साहन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शुभांगी औटी व प्रा. मंजुषा भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.प्रीतम ओव्हाळ यांनी (Hadapsar) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.