Hadapsar : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : महिलेला लग्नाचे आमिष (Hadapsar) दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 40 वर्षीय फिर्यादी महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात मुकेश सिंगवर (वय 30,  रा. मेहगाव ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दोघांची ओळख झाल्यानंतर मुकेशने महिलेसोबत प्रेमाचे नाटक केले. दोघांचे प्रेम संबंध निर्माण झाल्यानंतर ते दोघेही लिव्ह इन रिलेशीनशीपमध्ये राहत होते.

Maval : उद्योजक रामदास काकडे यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

यातील आरोपी आणि फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.  परंतु, लग्न न करता आरोपी पळून गेल्याने महिलेने पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.